Ad will apear here
Next
वसई पालिकेकडून सवलतीत रोपे
प्रातिनिधिक फोटोवसई : वसई शहर हरित करण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शेतकरी व नागरिकांना सवलतीच्या दरांमध्ये रोपे व कलमे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याकरिता विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती आदींच्या उत्कृष्ट जातींची रोपे व कलमे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून आणली जाणार आहेत. येत्या पावसाळ्यात ही रोपे उपलब्ध करून देण्यात येतील, असे महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे.

महापौरांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार विलास तरे, माजी आमदार डॉमिनिक गोन्सालविस, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बबनशेठ नाईक, वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश वझे, उपसभापती प्रकाश पाटील, संचालक अशोक कोलासो, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, संचालक राजेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

‘वसई-विरारमधील नागरिकांना व शेतकऱ्यांना कोकण कृषी विद्यापीठातून चांगल्या जातीची कलमे, रोपे आणून दिल्यास, शेतकरी व नागरिक त्यांची जोपासना करून ती रोपे वाढवतील. त्यामुळे शहर अधिक हिरवे होण्यासाठी मदत होईल,’ असे मत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या बैठकीत व्यक्त केले. महापौर प्रवीणा ठाकूर आणि आयुक्त सतीश लोखंडे यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. इच्छुक नागरिकांना प्रती व्यक्ती दोन रोपे सवलतीच्या दरात देण्यात येतील व त्यापेक्षा जास्त रोपे हवी असल्यास पूर्ण रक्कम भरून घेता येतील, असे चर्चेमध्ये ठरले. ‘दापोलीहून रोपे आणण्यासाठी होणारा वाहतुकीचा आर्थिक भार कृषी उत्पन्न बाजार समिती उचलील,’ असे सभापती रमेश वझे यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZMBBC
Similar Posts
अहिल्याबाई होळकर जयंतीचा उत्सव उत्साहात साजरा वसई : राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९२व्या जयंतीचा सोहळा विरारमध्ये चार जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विरार (पूर्व) येथील मनवेलपाडा तलाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांनी मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी सुमारे दोन-अडीच हजार जणांचा जनसमुदाय जमला होता
वसई विजयोत्सव साजरा वसई : पोर्तुगीजांना लढाईत हरवून नरवीर चिमाजी अप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकला होता. या विजयाचा आंनद म्हणून दरवर्षी ‘वसई विजायोत्सव’ साजरा केला जातो. यंदा त्याला २७९ वर्षे पूर्ण झाली. या वसई विजयदिनाचे औचित्य साधून बुधवारी (१० मे) रोजी सकाळी नऊ वाजता वसई किल्ल्यावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चिमाजी
प्राचीन देवळांच्या इतिहासाचे कथन वसई : प्राचीन मंदिरांविषयी माहिती देणारा ‘एक होते देऊळ’ नावाचा एक आगळावेगळा कार्यक्रम वसईतील इंद्रादित्य कला मंचाने आयोजित केला आहे. २० मे २०१७ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. मंदिरातील ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान आणि शिल्पसौंदर्य यावर आधारित मनोरंजक स्लाइड शो आणि इंडोलॉजिस्ट डॉ. उदयन इंदूरकर यांचा संवाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे
‘वृक्षसंवर्धन काळाची गरज’ पुणे : ‘वृक्षांमुळे मानवी जीवन आरोग्यदायी बनते. प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार देणारा विभाग आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य. डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language